मुखपृष्ठ/आमच्याबद्दल
मानुसकी अजुन जिवंत आहे

मानवतासेवा
हीच आमची परंपरा.

यशोधन ट्रस्ट — वेळे, ता. वाई, जि. सातारा येथील एक सेवाभावी संस्था, जी अनाथ, बेघर, वयोवृद्ध, अपंग व मानसिक रुग्णांना मोफत निवारा, आहार व वैद्यकीय निगा पुरवते.

RB
संस्थापक/अध्यक्षमा. श्री. रवी बोडके
सेवा परमो धर्मः
२०१४ पासून
सेवा परमो धर्मः
निवासी आश्रमात
११०+
🏆Awards
५५०+
SINCE2014
आमच्याबद्दल

यशोधन ट्रस्ट

यशोधन ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य ही वेळे, ता. वाई, जि. सातारा येथे स्थित एक सेवाभावी संस्था आहे. आमच्या आश्रमात अनाथ, बेघर, वयोवृद्ध, अपंग व मानसिक रुग्णांना मोफत निवारा, आहार व वैद्यकीय सेवा पुरवली जाते.

छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, छ. शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श ठेवून समाजातील अनाथ, बेघर, वयोवृद्ध, निराधार व वंचित घटकांच्या सेवेचे कार्य आम्ही चालवत आहोत.

२०१२ साली सातारा येथे अनाथ आश्रमाची निर्मिती केली. २०१८ ला वेळे, ता. वाई, जि. सातारा येथे स्वतःच्या जागेत आश्रम बांधला, जिथे आज ११० निराधार महिला-पुरुष राहतात. आत्तापर्यंत हजारो लोकांना मदत व शेकडो लोकांचे स्वतःच्या घरी पुनर्वसन केले आहे.

Yashodhan Trust Anathashram
स्थापना वर्ष
२०१४

आमचे स्तंभ

आमचे स्तंभ

🏠
अनाथांची निगा

अनाथाश्रम

अनाथ व बेघर बांधवांना मोफत निवारा, आहार व प्रेमळ संगोपन.

👴
वयोवृद्ध सेवा

वृद्धाश्रम

ज्येष्ठ नागरिकांना सकस आहार, सुरक्षित निवारा व आदरयुक्त सेवा.

💊
उपचार व निगा

वैद्यकीय सेवा

तपासणी, औषधोपचार, लसीकरण व आपत्कालीन वैद्यकीय सहाय्य.

🧠
समुपदेशन केंद्र

मानसिक आरोग्य

मानसिक रुग्णांसाठी मोफत सल्ला, मार्गदर्शन व प्रचार-प्रसार.

📚
ज्ञानसंपदा

वाचनालय

सर्वांसाठी मोफत वाचनालय — शेकडो पुस्तके उपलब्ध.

🐄
गजानंत गीर

गोशाळा

गजानंत गीर गाईंची गोशाळा — देशी गोवंशाचे संवर्धन व सेवा.

🎯

आमचे उद्दिष्ट उद्दिष्ट

प्रत्येक अनाथ, बेघर, वयोवृद्ध, अपंग व मानसिक रुग्णाला सुरक्षित निवारा, सकस आहार व वैद्यकीय सेवा पुरवून, त्याला उर्वरित आयुष्य सन्मानाने जगण्याची संधी देणे आणि वंचित घटकांचे समाजात पुनर्वसन करणे.

👁️

आमची दृष्टी दृष्टी

एक अशी सेवाभावी संस्था उभारणे जी केवळ निवारा पुरवण्यापुरती मर्यादित नाही, तर समुपदेशन, स्वयंरोजगार, मानसिक आरोग्य जागृती व पुनर्वसनाद्वारे समाजासाठी आदर्श ठरेल.

११०+
निवासी आश्रमात
सध्या
२०१४
स्थापना वर्ष
स्थापना
१०००+
मदत झालेले
लाभार्थी
५५०+
पुरस्कार प्राप्त
मान्यता
देवदूत: रवी बोडके — मासिक दिवाळी विशेषांक
📰 Press Feature
दिवाळी विशेषांक
देवदूत
वृत्तपत्रात झळकलेले

देवदूत :
रवी बोडके

तुम्ही होता, म्हणून आम्ही आहोत. तुमच्या असण्याने आमच्या असण्याला अर्थ आहे — असा भाव कृती-उक्तीतून व्यक्त करणाऱ्या, वृद्ध-निराधार-ज्येष्ठांना आणि अशक्तांना सशक्त करणाऱ्या, मानवतेचे देवदूत म्हणून उदयाला आलेले रवी बोडके यांच्या सामाजिक कृतीतून एकच गोष्ट अधोरेखित होते — माणुसकी अजून जिवंत आहे...!!

— दिवाळी विशेषांक, मासिक वृत्त

साताऱ्याच्या वाई तालुक्यातील वेळे या छोट्याशा गावी, १८ जुलै १९८५ रोजी एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेले रवी बोडके आज अनेक निराधार-बेघरांचे आधार बनले आहेत.

मुधोजी महाविद्यालय, फलटण येथून पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी समाजकार्याला वाहून घेतले. २०१२ साली सातारा येथे पहिला अनाथाश्रम सुरू केला, आणि २०१८ ला वेळे येथे स्वतःच्या जागेत आश्रम बांधला — आज तेथे ११० निराधार महिला-पुरुष सन्मानाने जगत आहेत.

हजारो लोकांना मदत, शेकडो लोकांचे पुनर्वसन, ५५०+ पुरस्कार आणि भारताचे राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते "GEMS OF INDIA २०२२" — हा प्रवास म्हणजे माणुसकीच्या सेवेची एक प्रेरणादायी गाथा.

१०००+
लोकांना मदत
५५०+
मान्यता पुरस्कार
GEMS OF INDIA २०२२
राष्ट्रपती सन्मान
संस्थापक

आमचे मार्गदर्शक

यशोधन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य च्या सेवाभावी कार्याचे प्रणेते व संस्थापक.

👑
संस्थापक/अध्यक्ष

मा. श्री. रवी बोडके

📞 +91 9922 4242 36
📋
संपर्क क्रमांक

यशोधन ट्रस्ट कार्यालय

📞 +91 99214 82223
🏠
मुख्य आश्रम

अनाथाश्रम — वेळे

📞 +91 99224 24236